Tue, Aug 20, 2019 15:10होमपेज › National › अधिकाऱ्याने चुकीचे बटण दाबले, १४० मते 'डिलीट'!

अधिकाऱ्याने चुकीचे बटण दाबले, १४० मते 'डिलीट'!

Published On: Apr 23 2019 7:43PM | Last Updated: Apr 23 2019 7:52PM
आग्रा : पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बूथ क्रमांक ४५५ वर निवडणुक आयोगाने फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बूथवर असलेल्या अधिकाऱ्याकडून चुकीचे बटण दाबले गेल्यामुळे १४० मते डिलीट झाली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने या मतदारसंघात २५ एप्रिलला फेरमतदान घेण्याची तयारी केली आहे.

आग्रा लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी बूथ क्रमांक ४५५ वर मतदानावेळी गोंधळ झाला. यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. याची दखल घेत आयोगाने या मतदारसंघात फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला. राजकीय पक्षांकडून देखील फेरमतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती.

१८ एप्रिलला उत्तर प्रदेश मधील नगीना, अमरोहा, बुलंदशहर, अलीगढ, हाथरस, मथुरा, आग्रा आणि फतेहपूर सीकरी या मतदार संघात मतदान पार पडले होते. या मतदारसंघात मथुरामधून अभिनेत्री तसेच भाजप नेत्या हेमा मालिनी, फतेहपूर सीकरीतून यूपी काँग्रेसचे प्रमुख राजबब्बर, आग्रातून यूपी सरकारचे कॅबिनेट मंत्री एसपी बघेल आणि अमरोहातून बीएसपीचे उमेदवार दानीश अली निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

आग्रा लोकसभा मतदार संघातील एत्मादपुर विधानसभा क्षेत्रातील बरहन येथील जटुआ गावात बूथ नंबर ४५५ पर फेरमतदान होणार आहे. या बूथवर 439 मतदार आहेत. सूत्राच्या माहितीनुसार मतदान मशीन खराब झाल्याने पूर्ण मते मोजणी होवू शकले नाहीत. मतदानावेळी २३९ मते पडली मात्र व्हिव्हीटी मशीनमध्ये अधिक चिट्ट्या मिळाल्या. यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्याची निर्णय घेण्यात आला आहे.