Tue, Oct 24, 2017 16:47होमपेज › National › भ्रष्टाचाराला मोठया प्रमाणावर आळा: नंदन निलेकणी 

‘आधार’मुळे ५८ हजार कोटींची बचत

Published On: Oct 13 2017 5:48PM | Last Updated: Oct 13 2017 5:48PM

बुकमार्क करा

वॉश्गिंटन: वृत्तसंस्था 

केंद्र सरकारच्या आधार कार्ड योजनेमुळे बोगस लाभार्थी आपोपाच व्यवस्थेबाहेर फेकले आणि त्यामुळे सरकारची तब्बल ९ अब्ज डॉलरची (सुमारे ५८ हजार ४०० कोटी रुपये)  बचत झाली, अशी माहिती  ‘आधार कार्ड’ योजनेचे शिल्पकार  नंदन निलेकणी यांनी दिली आहे. जागतिक बँकेने आयोजित केलेल्या ‘डिजिटल इकॉनॉमी फॉर डेव्हलपमेंट’ वरील चर्चा सत्रात ते बोलत होते.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरु केला हा प्रकल्प मोदी सरकारने अतिशय हिरीरीने राबवल्याने मोठे यश मिळाल्याचेही निलेकणी यांनी म्हटले आहे. योग्य पायाभूत सुविधांची उभारणी केल्यास विकसनशिल देशांना प्रगतीकडे झेप घेणे शक्य होईल असेही त्यांनी म्हटले आहे.  ‘आधार कार्डसाठी आतापर्यंत १०० कोटीहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. एका व्यक्तीस एकच ओळख क्रमांक देण्यात येत असल्याने सरकारी योजनांचा लाभ घेणारे बोगस लाभार्थी नाहीसे झाले. आता जवळपास ५० कोटी लोकांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले आहे. सरकारने अशा खात्यांमध्ये जवळपास १२अब्ज डॉलर थेट हस्तांरित केले आहते. अशा अनेक योजना आधार कार्डमुळे शक्य झाल्याचे आधार कार्ड तयार करणार्‍या युनिट आयडेंटी डेव्हलेपमेन्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे  ते माजी चेअरमन असलेल्या निलेकणी यांनी सांगितले.

’पेपरलेस, विनाअडथळा व्यवहार, ओळखपत्र प्रमाणीकरण ही काळाची गरज आहे. भारतानं ते करून दाखवलं आहे. भारत हा असा एकमेव देश आहे, जिथं अब्जावधी लोक मोबाइलच्या आधारे पेपरलेस, कॅशलेस व्यवहार करू शकतात. यातून खर्चाचीही बचत होते आणि खर्च कमी झाल्यामुळं डिजिटल व्यवहारांचे  प्रमाण आपोआपच वाढतं,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारताने ज्या आधुनिक पायाभूत सुविधा तयार केल्याच आहेत, त्याचा उपयोग लोक आपल्या प्रगतीसाठी करून घेत आहेत असेही त्यांनी म्ह्टले आहे.

१०० कोटी 
भारतात आतापर्यत १०० कोटीपेक्षा जास्त लोकांनी आधारची नोंदणी केली आहे.

५० 
सुमारे ५० कोटी लोकांनी आपली बँक खाती आधारशी संलग्न केली आहेत.


मोबाइलच्या आधारे पेपरलेस, कॅशलेस व्यवहार करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.