Tue, Sep 17, 2019 08:09होमपेज › National › धक्कादायक; महिलेचे केस कापून तिची विवस्त्र धिंड! 

धक्कादायक; महिलेचे केस कापून तिची विवस्त्र धिंड! 

Published On: Aug 26 2019 9:22AM | Last Updated: Aug 26 2019 9:22AM
कोडरमा : पुढारी ऑनलाईन

झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील डेंगीडोह गावात पंचायतीच्या अजब फतव्यानंतर एका महिलेचे केस कापून तिची गावातून विवस्त्र धिंड काढल्याची घटना घडली आहे. सदर महिलेचे तिच्या पुतण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करत पंचायतीने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पंचायतीच्या या फतव्याच्या एक दिवस आधी पीडित महिलेने पंचायतीकडे तक्रार केली होती, तिचा २२ वर्षाचा पुतण्या तिच्या पतीच्या गैरहजेरीत जबरदस्तीने संबंध ठेवतो. मात्र, पंचायतीने महिलेलाच दोषी ठरवत अजब फतवा काढला आणि तिचे केस कापून तिची गावातून विवस्त्र धिंड काढली. 

याबाबत कोडरमाचे एसपी एम. तमिल वंजन यांनी सांगितले की, या प्रकरणात ११ लोकांचा सहभाग आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक केलेले नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेने कोडरमा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex