Tue, Jan 21, 2020 12:11होमपेज › National › मोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'! 

मोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'! 

Published On: Jul 20 2019 7:10PM | Last Updated: Jul 20 2019 7:10PM
बेंगळुरू : पुढारी ऑनलाईन 

आयटी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूमध्ये बापाचे कारनामे मुलाने शोधून काढल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याचे झाले असे की ४३ वर्षीय वडिलांनी आपल्या १५ वर्षीय मुलाला गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला. मुलाने गेम खेळत खेळत अचानकपणे फोन रेकॉर्ड आणि व्हॉटसअप चॅट पाहिले. यावेळी त्या ठिकाणी अश्लील भाषेतील मेसेज आढळून आले. 

वडिलांचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे लक्षात येताच त्या मुलाने ते सर्व आईला दाखवले. दोघांमध्ये झालेले अश्लील संभाषण सुद्धा त्याने आईला दाखवले. मुलाची आई शिक्षिका असून त्या खासगी शिकवणी सुद्धा घेतात. बाणाशंकरी येथे राहणाऱ्या कुंटुंबावर बापाच्या कारनाम्यामुळे संसार धोक्यात आला आहे. 

नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा समोर येताच त्या शिक्षिकेने सरळ पोलिस स्टेशन गाठून कारवाई करण्याची मागणी केली. जेव्हा जेव्हा अनैतिक संबंधांबाबत विचारणा केली असता आपल्याला मारहाण झाल्याचा आरोपही त्या शिक्षिकेने केला. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार १५ वर्ष सुरू असलेला संसार त्यामुळे धोक्यात आला आहे. 

हा प्रकार ११ जुलैला घडला आहे. लफडं बाहेर आल्यानंतर पतीने आता त्या शिक्षिकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. शिक्षिकेचा पतीच्या कुटुंबियांकडूनही दबाव आणण्यास सुरुवात झाली आहे.