Fri, Oct 19, 2018 22:04होमपेज › National › दोन हजारची नोट मागे घेणार नाही : केंद्र सरकार

दोन हजारची नोट मागे घेणार नाही : केंद्र सरकार

Published On: Aug 10 2018 7:03PM | Last Updated: Aug 10 2018 7:03PMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

दोन हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. नोटा बंदीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दोन हजारची नवी नोट चलनात आणली. मात्र, ही नोटसुद्धा रद्द करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची अफवा पसरली होती. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी दोन हजार रुपयाची नोट मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे नमूद केले.