Thu, May 28, 2020 16:35होमपेज › National › तामिळनाडूत मंदिराशेजारी स्फोट; २ ठार, ४ जखमी

तामिळनाडूत मंदिराशेजारी स्फोट; २ ठार, ४ जखमी

Published On: Aug 26 2019 9:25AM | Last Updated: Aug 26 2019 9:25AM
चेन्नई: पुढारी ऑनलाईन

कांचीपूरमधील मनमाठी गावातील गंगाई अम्मन मंदिराशेजारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन ठार तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मंदिरात असलेला कुंडाची साफसफाई करत असताना एका कामगाराला एक अज्ञात वस्तू सापडली. त्याने ती वस्तू उघडण्याचा प्रयत्न केला असता अचानक स्फोट झाला. मंदिराशेजारी स्फोट झाल्याचे समजताच बॉम्ब पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नमुने जप्त केले असुन तो आयईडी स्फोट होता की नाही याची चाचणी सुरू आहे. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 दहशतवाद्यांनी प्रवेश केल्याची माहिती आणि स्थानिक मंदिराशेजारी झालेला हा स्फोट याचा राज्यामधील दहशतवादी सतर्कतेशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, स्फोटाविषयी ऐकल्यावर आम्हाला सुरुवातीलाच धक्का बसला. परंतू येथे येताच हा वेगळ्या प्रकारचा स्फोट असल्याचे स्पष्ट झाले, असेही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.