Wed, May 23, 2018 08:53होमपेज › National › 15 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी

15 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी

Published On: Feb 14 2018 1:59AM | Last Updated: Feb 14 2018 1:00AMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

लष्करासाठी 15 हजार 935 कोटींच्या शस्त्र खरेदीला सरकारी समितीने मंगळवारी मंजूरी दिली आहे. यात लाईन मशिन गन्स, एसॉल्ट  रायफल्स, स्नीपर रायफल्स यांचा समावेश आहे. यापैकी 7.4 लाख एसॉल्ट रायल्सचे उत्पादन विदेशी कंपनीच्या मदतीने भारतातच करण्यात येणार आहे. तर 5719 स्निपर रायफल्स आयात केल्या जातील. एसॉल्ट रायफलसाठी 12 हजार 280 कोटी देण्यात येणार असून तिन्ही दलांसाठी याची खरेदी केली जाईल. लाईट मशिन गन्ससाठी 1 हजार 819 कोटी तर स्निपर रायफलसाठी 982 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

गेल्या 11 वर्षांपासून सशस्त्र दलाला नव्या बंदुकांची गरज आहे. संरक्षणमंत्री प्रमुख असलेली शस्त्राशास्त्र खरेदीचा निर्णय घेणारी सरकारची एक सर्वोच्च समिती असून या समितीने गेल्या महिन्यात शस्त्र खरेदीचा प्रस्तावाला मंजूरी दिली होती.