Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › National › नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह पुन्हा बरळल्या (व्हिडिओ)

गांधींची हत्या करणारा देशभक्त; प्रज्ञा सिंहची मुक्ताफळे (व्हिडिओ)

Published On: May 16 2019 3:21PM | Last Updated: May 16 2019 6:56PM
भोपाळ (मध्य प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्‍या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा बरळल्या आहेत. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे याला हिंदू दहशतवादी म्हटले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांनी स्वत:ला निरखून पहावे. अशा लोकांना या निवडणुकीत उत्तर मिळेल.

कमल हसन यांनी एका सभेत बोलताना त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या चर्चेमध्येच नव्या मुद्द्याला तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट करत कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. आता याच मुद्यावरुन प्रज्ञा सिंह बरळल्या आहेत.