Sun, Feb 23, 2020 10:11होमपेज › National › निर्मला सीतारामण यांच्या 'उबर' ज्ञानावर टोमण्यांचा महापूर!

निर्मला सीतारामण यांच्या 'उबर' ज्ञानावर टोमण्यांचा महापूर!

Published On: Sep 11 2019 6:54PM | Last Updated: Sep 11 2019 7:11PM

निर्मला सीतारामणनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीबाबत वादग्रस्त विधान केले. सुरुवातीला देशात मंदी नाहीच असे ठासून सांगणाऱ्या अर्थमंत्र्यांचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कान टोचल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्राच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले. 

सीतारामण यांनी या समस्येचे खापर मिलेनियल्सवर (millennials) फोडले. हे मिलेनियल्स गाड्या खरेदी करण्याऐवजी ओला, उबर सेवेला प्राधान्य देतात असा अजब दावा त्यांनी केला. यावर नेटकऱ्यांनी सीतारामण यांना #BoycottMillennials हा हॅशटॅग वापरून चांगलेच ट्रोल केले. 

मिलेनियल्स ही संकल्पना काय आहे? 

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंदीला मिलेनियल्स जबाबदार आहेत असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर हे मिलेनियल्स कोण ज्यामुळे भाजपच्या विकासाभिमुख सरकारला मंदीवरुन उत्तरे द्यावा लागत आहेत. हा यक्ष प्रश्न अखंड भारतासमोर पडला. ही संकल्पना जे १९८१ ते १९९६ या दरम्यानच्या काळात जन्मलेल्यांना मिलेनियल्स असे म्हणतात. म्हणजे एका वाक्यात सांगायचे तर २१ शतकात ऐन तारुण्यात असलेली पिढी. सीतारमण यांच्या सध्या देशावर पडलेल्या मंदीच्या छायेला या मिलेनियल्स लोकांनी गाडीच्या कर्जाचा हप्ता भरण्यापेक्षा ओला, उबर सेवेला प्राधान्य देतात असा निष्कर्ष काढला आहे.