Sun, Jul 12, 2020 23:47होमपेज › National › जम्मू-काश्मीर : त्रालमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा 

जम्मू-काश्मीर : त्रालमध्ये दहशतवाद्याचा खात्मा 

Last Updated: Jun 02 2020 10:40AM

संग्रहित छायाचित्रश्रीनगर : पुढारी ऑनलाईन 

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवार दि. २ रोजी झालेल्या दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सिमोहमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची शोध मोहीम अद्यापही सुरू आहे. 

पाकिस्तानच्या सैन्याने शनिवार सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत सैन्याच्या चौक्यांसह रहिवाशी भागांवर निशाणा बनवून गोळीबार केला होता. कीरनी ते बालाकोटपर्यंत १०० किलोमीटरहून अधिक लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य साधले. त्यामुळे मेंढर सेक्टरमधील जवळपास ६ प्राणी जखमी झाले तर अनेक घरांचे नुकसान झाले. 

भारतीय सुरक्षा दलाकडून पाकला सडेतोड उत्तर देण्यात आले. कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. यामध्ये पाकिस्तानचे सहा सैनिक गंभीर जखमी झाले. पाकच्या सैन्याने शनिवारी सकाळपासून कीरनी, कस्बा, मंधार क्षेत्रांमध्ये मोर्टार डागले. त्यानंतर सायंकाळी गुलपुर सेक्टरमधील खडी करमाडामध्ये गोळीबार सुरू केला होता. प्रत्युत्तर दाखल भारतीय सुरक्षा दलांनीही पाकच्या सैन्यांना सडेतोड उत्तर दिले.