Sat, Feb 16, 2019 12:41होमपेज › Nashik › प्राणघातक हल्ल्यात तरुण ठार 

प्राणघातक हल्ल्यात तरुण ठार 

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:19PMसातपूर : वार्ताहर   

सातपूर येथील महादेववाडीमध्ये शनिवारी (दि.19) मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास काही संशयितांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी (दि.21) पहाटे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्षल वसंत साळुंके (27, पाथर्डी फाटा) असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयाबाहेर सकाळी हर्षलच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत हर्षल व संशयित प्रमोद डांगरे, सुनील गांगुर्डे, सुधीर भालेराव व इतर हे सातपूर येथील हॉटेल कुमारा बारमध्ये शनिवारी रात्री साडेबारा वाजता मद्यपानासाठी बसले होते. यावेळी येथे काही कारणावरून आपापसात वाद झाले. त्यामुळे संशयितांनी हर्षल यास महादेववाडी, सातपूर येथेे नेऊन जबर मारहाण केली. यात डोक्याला गंभीर इजा पोहचवून संशयित फरार झाले. परंतु, यांनतर हर्षल हा जखमी अवस्थेत कालिका मंदिर, मुंबई नाका येेथे आढळून आला. तेव्हा रस्त्याने जाणार्‍या एका अनोळखी वाहनचालकाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. दरम्यान, हर्षलचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मयत हर्षलचा मित्र मृणाल घोडके याने फिर्याद दिली असून, त्यानुसार सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.