Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Nashik › नांदूरमध्यमेश्वर धरणात तरुण बुडाला

नांदूरमध्यमेश्वर धरणात तरुण बुडाला

Published On: Feb 13 2018 10:58PM | Last Updated: Feb 13 2018 10:58PMसायखेडा : वार्ताहर

शिवरात्रीनिमित्ताने निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील यात्रेसाठी आलेला तळवाडे (ता. निफाड) येथील युवक नांदूरमध्यमेश्वर धरणात बुडाला आहे. अजय उर्फ पप्पू मधुसुदन सांगळे (वय, २९) असे बुडालेल्‍या युवकाचे नाव आहे. मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जयचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र, त्‍याचा मृतदेह मिळवून न आल्याने बुधवारी (दि.१४) शोध मोहीम राबविन्यात येणार आहे.

या बाबत माहिती अशी की, पप्पू सांगळे व त्याचे मित्र शिवरात्रीनिमित्ताने नांदूरमध्यमेश्वर येथे यात्रेला आले होते. यात्रेत दर्शन आटोपून ते नांदूरमध्यमेश्वर धरणावर फिरायला गेले. या ठिकाणी धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी ते उतरले यात पप्पू सांगळे खोल पाण्यात गेल्याने, त्याला खोलीचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे तो बुडायला लागला, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले. 

घटना समजल्यानंतर निफाडचे प्रभारी तहसीलदार आवळकंठी, सायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.