Tue, Jul 16, 2019 21:53होमपेज › Nashik › सिडको येथे पिकअपच्या धडकेत युवकाचा मृत्‍यू 

सिडको येथे पिकअपच्या धडकेत युवकाचा मृत्‍यू 

Published On: Feb 16 2018 7:18PM | Last Updated: Feb 16 2018 7:18PMसिडको : वार्ताहर

सिडकोतील विजयनगर येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्‍यू झाला आहे. तर, त्‍याची आई गंभीर जखमी झाली आहे. धीरज निवृत्ती सहाणे असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या युवकाचे नाव असून, अलका निवृत्ती सहाणे असे जखमी झालेल्‍या महिलेचे नाव आहे.  अपघात झालेल्या गाडीचालकाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धीरज सहाणे व त्याची आई अलका सहाणे या अंबड पोलिस ठाणे येथील स्वामीसमर्थ हॉस्पिटल येथून घरी परतत असताना भरधाव वेगात जात असलेल्या  पिकअपने (क्रमांक एम एच १५ एफ वाय १०७३)  त्‍यांच्या ऍक्टिव्ह (क्रमांक एम.एच.१५ डीडी ८४८४ )दुचाकीला धडक दिली. यात धीरजचा जागीच मृत्‍यू झाल्‍याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी अलका यांना खासगी उपचारासाठी रुग्णालयात  दाखल करण्यात आले.

धीरज हा एकुलता एक मुलगा असून, त्याच्या चारही बहिणींचा विवाह झाला आहे. तर, विशाल एक वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.