Sun, Jul 21, 2019 10:23होमपेज › Nashik › तळवाडेतील युवकाचा मृत्‍यू झाल्याने शोले स्‍टाईलने आंदोलन

तळवाडेतील युवकाचा मृत्‍यू झाल्याने शोले स्‍टाईलने आंदोलन

Published On: Mar 22 2018 2:06PM | Last Updated: Mar 22 2018 2:06PMजळगाव : बुद्रुक वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील एका तरुणाच्या मृत्यूस तळवाडे ते जामदरी रस्त्याचे अपूर्ण स्थितीत असलेले काम कारणीभूत ठरले होते.त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल होण्यास विलंब लागत असल्याच्या कारणाने आम आदमी पार्टीचे तालुका समनव्यक विशाल वडघुले यांनी नांदगाव तहसील कार्यालयात पाण्याच्या टाकीजवळ हे शोले स्टाईल आंदोलन छेडले होते. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता भावसार यांना पाचारण करण्यात आले. या प्रमुख मागणींसह तालुक्यातील इतर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊ, संकेत उगले याच्या मृत्यूबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल असे लेखी दिल्यानंतर हे आंदोलन समाप्त करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी, पोलिस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलिस निरीक्षक गवारे, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे आदींसह शेकडो लोक उपस्थित होते.