Sat, Aug 17, 2019 17:13होमपेज › Nashik › सेवेत असलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ अनिवार्य

सेवेत असलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ अनिवार्य

Published On: Nov 30 2017 11:30PM | Last Updated: Nov 30 2017 11:25PM

बुकमार्क करा

येवला :  प्रसाद गुब्बी 

   एकीकडे अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे अनेकवेळा जाहिरात देऊन शिक्षकांची सीईटी घेतली गेली. पण, भरती झाली नाही. त्यामुळे अनेक शाळांकडून रिक्त पदांवर अनुत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने  आता अशा सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्यात येणार आहे.

शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असा फतवाच काढला आहे.  ज्या शिक्षकांची नियुक्ती फेब्रुवारी 2013  नंतर सरळ सेवेने झालेली आहे. जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाही अशा शिक्षकांना आता तीन संधी परीक्षेसाठी देण्यात आलेली आहे. या सवलतीत शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या किमान शैक्षणिक, व्यावसायिक  अर्हतेनुसार टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मात्र, त्यानंतरही  अनेक शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे या शिक्षकांनाही आता शिक्षक पात्रता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे जर तीन संधीमध्ये तो शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाही झाला तर शिक्षण विभाग त्या शिक्षकावर काय कार्यवाही करणार याबाबत काढलेल्या अध्यादेशात कुठेही उल्लेख दिसत नाही.त्यामुळे शिक्षक  संभ्रमात पडलेले आहे. याबाबत शिक्षक संघटना काय पवित्रा घेतात याकडेही अनेकांचे लक्ष्य लागले आहे. शासनाने काढलेला हा  जीआर चुकीचा असून याबाबत शिक्षक संघटना आंदोलन करून याि नर्णयाला विरोध  करतील कारण हा शिक्षक पदवी व पदविकाधारक  असून बी. एड. आहे तसेच तो सर्व शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करतो व गुणवत्ता प्राप्त करतो मग एका तासाच्या परीक्षेवर त्याची गुणवत्ता  कशी काय ठरेल, असे  प्रतिक्रिया जिल्हा टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष आर. डी. निकम यांनी दिली आहे.