Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Nashik › तिकिटावरील चुकीच्या पत्त्यामुळे विमान प्रवाशांचे हाल  

तिकिटावरील चुकीच्या पत्त्यामुळे विमान प्रवाशांचे हाल  

Published On: Jun 15 2018 11:48PM | Last Updated: Jun 15 2018 11:38PMनाशिक : प्रातिनिधी

केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत नाशिक -दिल्ली विमानसेवेला शुक्रवारी (दि.15)   प्रारंभ झाला. दुपारी 2.30 वाजता विमानाने ओझर विमानतळाहून राजधानी दिल्लीसाठी उड्डाण घेतले. यामुळे देश आणि विदेशात कनेक्टिविटीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, प्रवाशांनी बुक केलेल्या  विमानांच्या तिकिटांवर ओेझर ऐवजी गांधीनगर विमानतळाचा उल्लेख असल्याने अनेकजण थेट गांधीनगरला पोहोचल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

 नाशिकहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.  विमान सोहळा सुरू होण्यासाठी अनेक नाशिककर साक्षीदार आहेत. विमान सेवा नाशिकच्या दृष्टीने खुपच फायदेशिर आहे. त्यामुळे नाशिकच्या अर्थकारणाला देखील चालना मिळेल.  

नाशिकहून दिल्लीला जाणारे प्रवासी पारस लहाडे म्हणाले की, मला या प्रवासात खुपच त्रास झाला. बुक केलेल्या तिकिटावर नाशिकच्या एअरपोर्टचे नांव गांधीनगर लिहिले होते.  आपण  गुगलवर सर्च केले तर तेेही तोच एअरपोर्ट दाखवित होता. त्यामुळे माझ्यासह काही प्रवासी गांधीनगरला  पोहोचले.  2-3 गेट असल्याने इकडे तिकडे फिरलो पण कोणीही व्यवस्थित माहिती दिली नाही. जेट एअरवेजच्या कस्टमर केअरला  फोन केला तर त्यांच्याकडूनही  व्यवस्थित  माहिती मिळाली नाही.  त्यानंतर मला समजले की, विमानसेवा ओझर एअरपोर्ट असल्याचे समजले. परंतु, जाताना रस्त्यात कुठेही  फलक देखील दिसले नाही.    आपणास स्थानिक   असूनही एवढा त्रास होतो तर बाहेरगावच्या प्रवाशांचे काय असा त्यांनी सवालही लोहाडे यांनी केला.