Mon, Aug 19, 2019 05:25होमपेज › Nashik ›

कामगारांच्या मागण्यांना तत्त्वत: मान्यता
 

कामगारांच्या मागण्यांना तत्त्वत: मान्यता
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 2:04AM
नाशिक : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना व मनपाचे अतिरिक्‍त आयुक्‍त किशोर बोर्डे यांच्यात बुधवारी (दि.4) झालेल्या बैठकीत महापालिका कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांना तत्त्वतः मान्यता मिळाल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे.

या बैठकीत प्रामुख्याने लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसहक्काने नियुक्‍ती देण्याची प्रलंबित प्रकरणे मंजूर करणे, सफाई कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता सूची अद्यावत करणे, शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग तीन पदावर पदोन्नती करणे, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या पदावर सफाई कर्मचार्‍यांचे रिक्त पदे सरळ सेवेने भरणे, कर्मचार्‍यांचे मापदंड निश्‍चित करणे, सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे, डॉ.बाबासाहेब आंबडेकर श्रम साफल्य आवास योजना लागू करणे, प्रधानमंत्री आवास योजना लागू करणे, अपघात विमा योजना देणे, सफाई कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे, कामगार कल्याण निधीत वाढ करणे, गणवेश व इतर साहित्यांसाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करणे आदी मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी वरील मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केला. बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन हिरे, कामगार कल्याण अधिकारी सहआयुक्त ए. पी. वाघ यासह संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र कंडारे, राज्य सचिव राजेश राठोड, दत्ता क्षीरसागर, योगेश रकटे, संतोष वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Tags : Nashik, workers, demand, temporary, granted