Mon, Sep 24, 2018 18:49होमपेज › Nashik › नाशिकमध्ये चार महिन्यांत सीसीटीव्ही बसविणार

नाशिकमध्ये चार महिन्यांत सीसीटीव्ही बसविणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने येत्या चार महिन्यांत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने शहराच्या अनुषंगाने महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

सातपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तरतूद असल्याने ही यंत्रणा बसविण्यास विलंब झाला. अन्यथा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सीसीटीव्ही शहरात आजवर लागले असते. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने या कॅमेर्‍यांचा उपयोग होणार आहे.