Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Nashik › नाशिक : सिन्‍नरमध्ये पतीकडून पत्‍नीचा खून

नाशिक : सिन्‍नरमध्ये पतीकडून पत्‍नीचा खून

Published On: Jul 15 2018 11:07AM | Last Updated: Jul 15 2018 9:47AMसिन्नर: प्रतिनिधी

सिन्‍नर तालुक्यातील नायगाव येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा विळ्याने वार करुन खून केल्याची घटना रविवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली. गंगूबाई भगवान बोडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर पती भगवान बोडकेने आपल्या बारा वर्षीय मुलाला सोबत घेऊन सायकलने नाशिकरोड पोलिस स्‍थानकात हजर झाला.

पोलिसांनी भगवानला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे कर्मचार्‍यासोबत घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे.