Sat, Apr 20, 2019 10:15होमपेज › Nashik › नाशिकला मोठा शस्त्रसाठा जप्त; तिघांना अटक

नाशिकला मोठा शस्त्रसाठा जप्त; तिघांना अटक

Published On: Dec 15 2017 8:19AM | Last Updated: Dec 15 2017 8:56AM

बुकमार्क करा

चांदवड : सुनिल थोरे

मालेगावकडून मुंबईकडे शस्त्रसाठ्याची तस्करी करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली. चांदवड पोलिसांनी टोलनाक्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.

शस्त्रसाठ्याच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सलमान खान(शिवडी, मुंबई), नागेश बनसोडे(नाशिक), बदरीजुमान बादशहा (शिवडी, मुंबई)   अशी आहेत. टोलनाक्यावर त्यांच्या गाडीची (एम. एच. ०१, एस. ए. ७०३४) ची पोलिसांनी झडती घेतली असता या गाडीत लहान मोठ्या २५ रायफल, १९ गावठी कट्टे, ४ हजार जीवंत कारतूस सापडल्याची माहिती पोलीस वर्तुळातून मिळत आहे. हा सर्व शस्त्र साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून या तिघा जणांची मध्यरात्री पासून पोलीस कसून चौकशी करीत आहे.

या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी चांदवडला थांड मांडून बसले आहे. या संदर्भात लवकरच पोलिसाद्वारे पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

(सर्व छायाचित्रे रईस शेख)

Image may contain: people sitting

Image may contain: food

Image may contain: one or more people, people standing and shoes