Tue, Jul 16, 2019 21:54होमपेज › Nashik › महाराष्ट्रातील व्यापार,उद्योग विकासासाठी मदत करू

महाराष्ट्रातील व्यापार,उद्योग विकासासाठी मदत करू

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:28PMनाशिक : महाराष्ट्रातील व्यापार, उद्योगाचा विकास व त्याचबरोबर राज्याचा सर्वांगीण विकास त्यासाठी महाराष्ट्र चेंबर करीत असलेले प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहे. दिल्‍लीस्थित महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन चेंबरच्या कार्यास नेहमीच सहकार्य करून व्यापार व उद्योगाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही सर्व जण एकत्रित प्रयत्न करू, असे आश्‍वासन वाणिज्य व नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केेले.

राज्यातील व्यापार, उद्योग, शेती व सेवा क्षेत्रातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे, उद्योजकांचे प्रश्‍न व समस्यांची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्री,  खासदार आणि दिल्लीस्थित महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी यांचे स्नेहसंमेलन   वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या निवासस्थानी  पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.   यावेळी व्यासपीठावर गृहराज्यमंत्री  हंसराज अहिर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खा. संजय राऊत, खा. रामदास तडस, खा. ए. टी. पाटील, खा. धनंजय महाडिक, चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, चेंबरचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर उपस्थित होते.प्रारंभी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा प्रास्ताविकात म्हणाले की,  राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र चेंबर केंद्र व राज्य सरकारबरोबर हातात हात घालून कार्य करीत आहे. चेंबरचे संस्थापक  वालचंद शेठ यांचे देशाच्या उद्योग उभारणीत स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन हा स्टार्टअप दिन म्हणून जाहीर करावा व त्याचे नावे पुरस्कार द्यावेत. तसेच लघुउद्योजकांच्या काही प्रश्‍नांकडे  मंडलेचा यांनी लक्ष वेधले.  माजी अध्यक्ष हेमंत राठी, विक्रम सारडा, माजी उपाध्यक्ष विलास शिरोरे, सुनीता फाल्गुने, सोनल दगडे, स्मिता मंडलेचा, रेखा पाघधरे,  पुष्पलता तळेकर, सीमा शहा, दीपाली चांडक, उर्वशी धराधर, अंजू सिंघल, नेहा खरे, सागर नागरे, चंद्रकांत दीक्षित आदींसह चेंबरचे सदस्य उपस्थित होते.