Sat, Jan 19, 2019 04:22होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यातील टँकर 32 वर पोहोचले

नाशिक जिल्ह्यातील टँकर 32 वर पोहोचले

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 25 2018 12:21AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील उन्हाच्या चटक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष भासू लागले आहे. तब्बल 61 गावे व वाड्यांमध्ये टंचाई आ वासून उभी असून, या गावांना एकूण 41 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. 

यंदा एप्रिलमध्ये जिल्हा होरपळून निघाला आहे. एप्रिलच्या मध्यातच पार्‍याने चाळिशी पार केली. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेला उन्हाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हाबरोबर पाण्याचे स्रोत आटत चालल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी एकतर वणवण करावी लागत आहे. अन्यथा प्रशासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात सध्या 61 गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 41 टँकर्स धावताहेत. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा येवल्याला बसत आहेत. तालुक्यातील 40 गावे तहानलेली आहेत. या गावांना 16 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. 

Tags : nashik, water supply,