Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Nashik › ४२ गाव पाणीपुरवठा योजना पंधरा दिवसात सुरळीत करा

४२ गाव पाणीपुरवठा योजना पंधरा दिवसात सुरळीत करा

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 12:06AM

बुकमार्क करा
जळगाव बुद्रुक : वार्ताहर

नांदगाव, चांदवड तालुक्यातील रखडलेली 42 गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत करून, येत्या 15 दिवसात ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी दिले आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

 नांदगाव तालुक्यातील 26 व चांदवड तालुक्यातील 16 अशा 42 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची संबंधित ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी कशी वासलात लावली, याची सचित्र वृत्तमालिका दै. ‘पुढारी’ने 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत प्रसिद्ध केली. या वृत्तमालिकेची दखल खुद्द राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घेतली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी नागपूर येथे या वृत्त मालिकेची कात्रणे ना. मुंडे यांना दाखवत यावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती.

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी संबंधित 40 गावातील सरपंच, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, नांदगाव, चांदवडच्या गटविकास अधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत वरील 42 गाव पाणीपुरवठा योजनेची जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुरुस्ती करावी व संबंधित ग्रामपंचायतींनी या योजनेची थकीत पाणी पट्टी व वीज बिल रक्‍कम एक संयुक्‍त खाते उघडून त्यात जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.