Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Nashik › बंधारा भरल्याने आनंदोत्सव

बंधारा भरल्याने आनंदोत्सव

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMयेवला : वार्ताहर 

तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील सुरेगाव रस्ता येथील देवनदीवर नारायणगिरी महाराज फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नाने 500 मीटर लांब व 70 फूट रुंद ते 30 फूट खोल खोदकाम करून 12 फूट उंच सिमेंटचा बंधारा पं. स. उपसभापती रूपचंद भागवत यांनी फाउंडेशनचे माध्यमातून स्वखर्चातून बांधला आहे. 

यामुळे लाखो लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. बंधारा जून महिन्यात झालेल्या पावसाने 40 टक्के भरला होता. मात्र, आता पालखेड डावा कालव्यास पाणी सोडल्याने सुरेगाव येथील देवनदीत बांधलेला बंधारा पाण्याने भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी वाढलेले असून गवंडगाव, सुरेगाव रस्ता, तळवाडे, पिंपळखुटे आदी गावांतील जमीन ओलिताखाली आली आहे. हंगामी व रब्बी अशा दोन्ही पिकांना बंधार्‍याचा पाण्याचा लाभ मिळणार असल्याने शेतकरी खूश आहेत.