Thu, Nov 15, 2018 15:51होमपेज › Nashik › रेल्वेस्थानकावर मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

रेल्वेस्थानकावर मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

Published On: Dec 14 2017 2:53AM | Last Updated: Dec 14 2017 2:44AM

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर

रेल्वे प्रशासन आता लवकरच प्रवाशांना अत्याधुनिक मशीनद्वारे शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पाणी पाजणार आहे. यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणार असून, पैशाची बचत होणार आहे. 
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील आरओ पाणी देणारे वॉटर व्हेन्िंडग मशीन बदल्याचे काम सुरू झाले आहे. या मशीनच्या जागी आता अत्याधुनिक मशीन उपलब्ध झाले आहे. नवीन मशिनमध्ये नाणे टाकून प्रवासी पाणी घेऊ शकतील. ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहेत.

नाशिक परिमंडळा अंतर्गत येणार्‍या नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये वॉटर व्हेन्डिंग मशीन बसवण्यात आले आहेत. फन्टुस कंपनीने ही मशिन्स बसवली आहेत. नाशिकरोडच्या फलाट 1आणि 2 वर प्रत्येकी दोन तर फलाट क्रमांक 4 वर एक मशीन आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दैनंदिन प्रवास करणार्‍या सुमारे पंधरा हजार प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे. लहान स्थानकातही सुविधा नाशिकरोड  हद्दीतील 7 स्थानकाना वाटर प्युरिफायरच्या सहाय्याने शुध्द पाणी देण्याचा सुरुवात झाली आहे. घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड, उगाव यांचा यात समावेश आहे.