Mon, Jun 17, 2019 02:19होमपेज › Nashik › संपादित विनावापर जमिनी मालकांना परत करा : गावित

संपादित विनावापर जमिनी मालकांना परत करा : गावित

Published On: Dec 20 2017 4:27PM | Last Updated: Dec 20 2017 4:27PM

बुकमार्क करा

अस्वली स्टेशन : वार्ताहर

 इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातील विविध धरणांसाठी सरकारने संपादित केल्या आहेत. परंतु अद्यापही विनावापर असलेल्या शेकडो हेक्टर जमिनी तशाच पडून आहेत. त्या मूळ मालकांना विनाअट परत कराव्यात अशी विधांनभवनसमोर एकमुखी मागणी नागपूर  हिवाळी अधिवेशनात इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी केली. याबाबतचे निवेदन  गावित यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यात असलेल्या वैतरणा, दारणा, मुकणे, कडवा, वाकी, खपरि, गौतमी, भाम, भावली, गोदावरी आदी धरणांसाठी सरकारने सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्र संपादित केलेले आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहिन झालेले आहेत. संपादित क्षेत्रातील अशा अनेक जमिनिअद्यापही पडून आहे जेथे धरणांचे पाणी येतच नाही. दरम्यान सरकारच्या राजपत्रातील भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम२०१३ च्या दिनांक २४ मे २०१४ अंतर्गत भूमीसंपादणाने कोणतीही जमीन संपादन केल्यापासून पाच वर्षे जर वापरात आलेली नसेल तर ती मूळ मालकांना परत केली जाईल अशी तरतूद आहे. हे गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच वैतरणा धरणाची प्रस्तावित उंची पाच फुटांनी कमी झाल्यामुळे सन १९७८ च्या सुमारास जवळपास १५०० एकर जमीन अतिरिक्त ठरवून जलसंपदा विभागाने ती मूळ मालकांना परत करण्यासंबंधी महसूल विभागास कळविले आहे.

दोन्ही तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण होऊन जवळपास पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून जाऊनही सरकारने उपरोक्त जमिनी अद्यापही परत केलेल्या नसून त्या तात्काळ मूळ मालकांना परत करण्याची मागणी आमदार गावित यांनी केली.