Wed, Jul 24, 2019 14:21होमपेज › Nashik › नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्यात सव्वीस हजार पक्ष्यांची दाटी!

नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्यात सव्वीस हजार पक्ष्यांची दाटी!

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 12:04AM

बुकमार्क करा

उगाव : वार्ताहर

आल्हाददायक वातावरणासाठी देशी-विदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा आसरा असलेल्या नांदूर मध्यमेश्‍वर पक्षी  अभयारण्यात नाशिक वन्यजीव विभाग व पक्षी मित्रमंडळ, निफाड यांच्या वतीने पक्षीगणना करण्यात आली. त्याता स्पाटेड ईगल, पेंटेड स्नाइप, डार्टर लार्च, कार्मोरंट या दुर्मिळ पक्ष्यांसह सव्वीस हजार विविध  प्रजातींचे पक्षी आढळले. 

निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्‍वर धरणस्थळावरील पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे. देश-विदेशातील हजारो पक्ष्यांचे थवे येथील धरणाच्या जलाशयावर विसावले आहेत. या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांची  गणना वन्यजीव विभाग आणि पक्षिमित्रांच्या वतीने करण्यात आली. या पक्षीगणने दरम्यान रिफ इग्रेट, कोलार्ड, पराँटीकोल, पेड मैना, लार्ज कार्मोरंट, ग्रेट किर्मोरंट, नार्दन शावलर, पेंटेल, विजन स्नेप, युरेशियन, क्रुलेव, काँमडक, गढवाल, गरगनी पोचार्ड,  विशलिग डक, पांढरा, काळा ग्लोसी आयबीज, परपल हेरान, ग्रेथ हेरान, पाँड हेरान  व मार्श हरीयर, कॉमन क्रस्टल, किट यांच्यासह विविध देशी-विदेशी जातीचे पक्षी आढळले. पक्षीगणनेत वनपरीक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, पक्षिमित्र दत्ता उगावकर, पक्षिमित्र मंडळाचे अध्यक्ष  डॉ. उत्तम डेर्ले, किरण बेलेकर, राहुल वडघुले, गंगाधर आघाव, अमोल दराडे, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे आदींनी सहभाग घेतला.