Mon, Nov 19, 2018 10:42होमपेज › Nashik › निफाड तालुक्यात डिझेलची पाइपलाइन फुटली

निफाड तालुक्यात डिझेलची पाइपलाइन फुटली

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:48PM

बुकमार्क करा

उगाव : वार्ताहर 

मुंबई ते मनमाड दरम्यान असलेली डिझेलची भूमिगत पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी शिवारात बुधवारी (दि.6) रात्री फुटल्याने हजारो लिटर डिझेलचा अपव्यय झाला आहे. तंत्रज्ञानामुळे ही घटना निदर्शनास येताच परिसरात डिझेल वितरण बंद करण्यात आले. घटनास्थळावर बीपीसीएल कंपनीच्या अधिकार्‍यांनी ठाण मांडून दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

निफाड तालुक्यातून ‘बीपीसीएल’ची मुंबई ते मनमाड भूमिगत पाइपलाइन गेली आहे. दहा फुटांपेक्षा अधिक खोलवरून गेलेली ही पाइपलाइनला खानगाव शिवारातील दाट बाभळीच्या जंगलात बुधवारी (दि.6) रात्री फुटल्याचे निदर्शनास आले. डिझेलची गळती सुरू असल्याची बाब ‘बीपीसीएल’ च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुख्यालयात समजली.