Sun, Jul 12, 2020 17:20होमपेज › Nashik › पांझरा नदीतून दोन युवक वाहून गेले 

पांझरा नदीतून दोन युवक वाहून गेले 

Published On: Aug 12 2019 6:58PM | Last Updated: Aug 12 2019 6:58PM
धुळे : प्रतिनिधी 

धुळ्याच्या पांझरा नदीमधून वेगवेगळ्या घटनेत दोन युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दोघांचा शोध आपत्ती व्यवस्थापन निवारण पथक घेत आहेत.

धुळ्यातील पांझरा नदीमध्ये पुराचे पाणी ओसरले असले तरीही अद्याप देखील अक्कलपाडा प्रकल्पामधून सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो आहे. आज या पाण्यात कुमारनगर पुलानजीक अक्षय सोनवणे हा युवक आंघोळीसाठी उतरला. अंत्यविधीवरुन आल्यानंतर तो नदीच्या प्रवाहात उतरला. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून जावू लागला. ही बाब काठावर कपडे धूत असलेल्या महिलांना लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार काही तरुणांनी पाण्यात उड्या टाकून अक्षयचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तोपर्यत अक्षय पुरात वाहून गेला होता. ही माहिती आपत्ती निवारण पथकाला देण्यात आल्याने पथकाने नदीच्या पाण्यात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, वरखेडी गावातील नदीपात्रातून विलास मराठे हा तरुण वाहून गेला असून त्याचा देखील शोध घेणे सुरू आहे.