Sun, Nov 18, 2018 20:09होमपेज › Nashik › सिन्नर, चांदवड जलसिंचनात होणार ‘अमीर’

सिन्नर, चांदवड जलसिंचनात होणार ‘अमीर’

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 11:02PM

बुकमार्क करा

नाशिक : गौरव जोशी

वर्षानुवर्षे पाचवीला पूजलेला दुष्काळ; डिसेंबरनंतर टँकरवर अवलंबून राहणारी जनता तसेच पाण्याअभावी करपलेली शेती असे चित्र असणार्‍या सिन्नर व चांदवड तालुक्यातील टंचाई लवकरच सरणार आहे. कारण, अभिनेता अमीर खान याच्या पाणी फाउंडेशन संस्थेने हे दोन्ही तालुके दत्तक घेतले असून, येत्या काळात ही संस्था तेथेे पाण्यावर काम करणार आहे. त्यामुळे भविष्यात हे तालुके पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

टंचाईग्रस्त भागांमधील नागरिकांना सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जगण्याचा नवा मार्ग दाखविणार्‍या पाणी फाउंडेशनचे काम आज घराघरांत पोहोचले आहे. संस्थेने नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिन्नर व चांदवड तालुका दत्तक घेतला असून, या दोन्ही तालुक्यांत येत्याकाळात पाण्यासाठी काम करणार आहे. पाणी फाउंडेशनने गेल्या दोन ते तीन वर्षांत राज्यातील विविध भागांत केलेल्या कामांमधील अनुभवाचा वापर करत सिन्नर व चांदवडमधील टंचाईवर काम करणार आहे. त्यासाठी या दोन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था तसेच इतर संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.