Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › शेततळ्यात दोघे बुडाले

शेततळ्यात दोघे बुडाले

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 26 2018 10:54PMमालेगाव : वार्ताहर

चोंढी शिवारातील शेततळ्यात वीजपंप बसवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. येथील शेतकरी सुभाष पोमनार यांच्या शेतात हे शेततळे आहे. या शेततळ्यातील वीजपंप नादुरूस्त झाला होता. तो दुरुस्त करून आणल्यावर ज्ञानेश्‍वर सुकदेव ढोणे (18) व मेघराज सुभाष पोमनार (20) हे   वीजपंप पाण्यात सोडत होते. असताना ज्ञानेश्‍वर याचा अचानक पाय घसरल्याने ते शेततळ्यात पडला. मेघराज याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तोही पाण्यात पडला.

यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पाण्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या दोन्ही मित्रांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. या दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा तरुणांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.