Wed, Nov 21, 2018 13:29होमपेज › Nashik › रस्त्यावरील दुचाकीस्वारांना उडवत जाणाऱ्या ट्रकचालकाला चोप 

रस्त्यावरील दुचाकीस्वारांना उडवत जाणाऱ्या ट्रकचालकाला चोप 

Published On: Jun 04 2018 8:16AM | Last Updated: Jun 04 2018 8:16AMजळगाव : प्रतिनिधी 

जळगावयेथील पारोळा महामार्गावर रस्त्यात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हिमाचल पासिंगच्या ट्रकने उडवल्याची घटना घडली. या दुचाकीस्वारांना उडवत जाणाऱ्या ट्रकचालकाचा करंजी आणि पारोळ्यातील तरुणांनी पाठलाग  करुन त्याला पकडले. त्याला पकडल्यानंतर बेदम चोप दिला. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

पारोळा येथील महामार्गावरील हिमाचल हॉटेलमध्ये हिमाचलचा ट्रकचालक लायकुराम धिमान (वय २१) याने मारामारी केली. त्यानंतर त्याने महामार्गवर भरधाव ट्रक चालवत वाटेत येण्याऱ्या दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात सुदर्शन नगर, पारोळा येथील दिनेश विठ्ठल बेडिस्कर (वय १४) याचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच करंजी आणि पारोळ्यातील तरुणांनी दुचाकीवरुन या ट्रकचालकाचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर या ट्रकचालकाला सहयोग हॉटेल जवळ गाठून  चांगलाच चोप दिला. दरम्यान, पोलिस तेथे पोहचे आणि त्यांनी हिमाचलच्या ट्रकचालकाला तरूणांच्या तावडीतून सोडवत  पेंढारपुरा पोलिस स्टेशनला आणले. याचबरोबर त्याचा हिमाचल प्रदेश पासिंगचा ट्रक जप्त करण्यात आला. 

चार ते पाच दुचाकीस्वारांना उडवत जाणाऱ्या धिमानला पोलिस स्टेशनला आणल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिस स्टेशनबाहेर गर्दी केली आणि धिमानला बाहेर काढा अशी मागणी केली. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे बघितल्यावर पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. जमाव शांत झाल्यावर ट्रकचालक धिमानवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 

Tags : jalgaon, jalgaon news, accident, himachal paradesh truck driver, ran over his truck, parola highway