Tue, Nov 13, 2018 01:56होमपेज › Nashik › जळगाव : तपासणी करणार्‍या पोलिसावरच घातला ट्रक

जळगाव : पोलिसालाच ट्रकखाली चिरडले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जळगाव : पुढारी ऑनलाईन

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगावजवळ तपासणी करणार्‍या वाहतूक पोलिसावरच ट्रक घातल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. महामार्ग पोलिस चौकीसमोरच घडलेल्या या घटनेत पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. अनिल शालिग्राम शिसोदे (वय ५२ रा. डांगरी ता. अमळनेर) असे मृत पोलिसाचे नाव आहे. 

येथील महामार्ग पोलिस चौकीसमोर अनिल हे वाहनांची तपासणी करत होते. यावेळी ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक न थांबता थेट त्यांच्या अंगावर घातला. सोमवारी (दि. २६) रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्‍थळावरून फरार झाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला आहे.

मृत शिसोदे यांच्या पश्चात पत्‍नी, मुलगा, मुलगी, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. 

Tags : jalgaon, jalgaon news, traffic police, truck accident


  •