Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Nashik › त्र्यंबकला विक्रमी मतदान

त्र्यंबकला विक्रमी मतदान

Published On: Dec 11 2017 1:59AM | Last Updated: Dec 11 2017 1:54AM

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर/इगतपुरी : वार्ताहर

अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या जागांसाठी रविवारी शांततेत मतदान झाले.त्र्यंबकेश्‍वर पालिकेच्या नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या  16 जागांसाठी 84.74 टक्के मतदान झाले. ईव्हीएम नादुरुस्तीच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडले. 32 मतदान केंद्रांवर 4 हजार 430 पुरुष, 4 हजार 564 महिला अशा एकूण 8 हजार 994 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

इगतपुरी नगरपालिकेसाठी सरासरी 68.53 टक्के मतदान झाले. यात 69.45 टक्के मतदारांनी हक्क बजावला.सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 5 मधील पोटनिवडणुकीसाठी 47.78 टक्के मतदान झाले. सकाळी 10 पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.