Tue, Nov 19, 2019 10:04होमपेज › Nashik › त्र्यंबकच्या नगराध्यक्षांना माथेफिरूची मारहाण

त्र्यंबकच्या नगराध्यक्षांना माथेफिरूची मारहाण

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 11:08PM

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर एका माथेफिरू तरुणाकडून हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि.14) सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरू प्रदीप अडसरे यास ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे निवासस्थानापासून जवळच असलेल्या कुशावर्त चौक येेथे उभे होते. त्याचवेळी प्रदीप अडसरे या युवकाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात लोहगावकर यांच्या गळ्याला खरचटले आहे. हे वृत्त समजताच शहरातील भाजपाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. नगराध्यक्षांना मारहाण करणार्‍या अडसरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जमाव पांगला. बंधू गिरीश लोहगावकर, पत्नी व भावजयी यांनाही मारहाण झाली. बंधू नगरसेवक ललित लोहगवकर यांच्यावरही प्रदीपने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.