Sun, Nov 18, 2018 02:52होमपेज › Nashik › राष्ट्रवादीची आज हल्लाबोल सभा 

राष्ट्रवादीची आज हल्लाबोल सभा 

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:09AMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 10) नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. गोल्फ क्लब येथे होणार्‍या सभेसाठीची तयारी पूर्ण केली आहे. सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी एकप्रकारचे शक्तिप्रदर्शन करणार आहे. 

राज्यातील सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल यात्रा सुरू केली आहे. गत महिन्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहचली. यावेळी राष्ट्रवादीने सरकारवर टीकेची एकही संधी सोेडली नव्हती. उत्तर महाराष्ट्रातील या यात्रेचा समारोप सोमवारी दुपारी 4 वाजता जाहीर सभेने होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे यावेळी जाहीर सभा घेणार आहेत. सभेसाठी गोल्फ क्लब मैदानावर भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभेसाठीच्या बारीकसारीक गोष्टींवर स्थानिक नेते व पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. 

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, आ.भास्कर जाधव, आ.शशिकांत शिंदे, आ.राजेश टोपे, नवाब मलिक आदी प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.उत्तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते व पदाधिकारी या सभेसाठी येणार आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय निरीक्षक नेमण्यात आले आहे. सभेसाठी जास्त कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतर राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे.