होमपेज › Nashik › बिबट्याचे तीन बछडे आढळले

बिबट्याचे तीन बछडे आढळले

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Feb 28 2018 11:24PMदिंडोरी : वार्ताहर

तालुक्यातील निगडोळ येथे उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील निगडोळ येथील तुकाराम विश्‍वनाथ मालसाने यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. तोडणीदरम्यान कामगारांना एक  बिबट्या व दोन बछडे आढळले. कामगारांना बघून मादी नदीकडे निघून गेली. तर बिबटे उसातच लपून बसला आहे. शेतकर्‍यांनी ही माहिती उपसरपंच शरद मालसाने यांना दिली. त्यांनी वनाधिकारी सुनील वाडेकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना कळविले. वाडेकर यांनी तातडीने वन कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. एक बछडा आढळला त्यास मादी ज्या भागात गेली त्या कोलवन नदी  परिसरातील झाडाझुडपाकडे हुसकून लावण्यात आले.  मादी बछड्यांना घेऊन जंगलात जाण्याचा अंदाज वनखात्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे; परंतु तूर्तास वनविभागाने येेथे बंदोबस्त तैनात करत ग्रामस्थांचे प्रबोधन करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.