होमपेज › Nashik › एक कोटी रुपयांसह फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एक कोटी रुपयांसह फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Published On: Aug 18 2018 9:25AM | Last Updated: Aug 18 2018 9:25AMजळगाव : प्रतिनिधी

एक कोटींच्या जुन्या नोटा नोटा घेऊन जात असलेल्या तीन फरारी आरोपींना रावेरकडून खंडवा मार्गावर पोलिसांनी पकडले. खंडवा एटीएस आणि इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. मध्यप्रदेशातील इंदौरजवळ गुरुवारी(दि. १६) त्यांना पकडण्यात आले. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कोटींच्या जुन्या नोटांच्या बदल्यात आरोपींना २५ लाख रुपयांच्या नव्या नोटा मिळणार होत्या. या जुन्या नोटा सुरतमध्ये एका व्यक्तीला देण्यात येणार होत्या. त्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. सध्या आरोपींची चौकशी सुरु आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे हबीब खान, सय्यद इमरान आणि सईद शोएब अशी आहेत. इंदोर पोलिसांनी चिंच ब्रिज येथून तिघांना जुन्या नोटांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून एक हजारांच्या ८३ लाख रुपयांच्या तर ५००च्या १७ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

इंदौरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी पत्रकारांना सांगितले की, हबीब खान अहमदाबाद हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदाचा उपचार करतो. तो रावेर येथेही अनेक दिवसांन पासून राहत होता. भुसावळचे सय्यद इमरान हे एमआर व मालमत्ता व्यवसायिक आहेत आणि सूरतमधील सईद शोएब साडीच्या दुकानात काम करतो. गुरुवारी, खंडवा एटीएसने दिलेल्या माहितीवरुन इंदौर पोलिसांनी सापळा रचून तीन जणांना पकडले आहे.

 इन्कम टॅक्स विभागाला दिली माहिती

एवढ्या मोठ्या संख्येने जुन्या नोटा पकडल्याची आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६  रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १ हजार च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर १०, ५०, २०० आणि २ हजार रुपयांच्यार नव्य नोटा चलनात आल्या आहेत.