Fri, Apr 19, 2019 13:54होमपेज › Nashik › नांदेड : अडीच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठयास अटक

नांदेड : अडीच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठयास अटक

Published On: Jul 18 2018 8:04PM | Last Updated: Jul 18 2018 8:04PMनांदेड : प्रतिनिधी

धर्माबाद तालुक्यातील आटाला येथील शेत जमिनीचा फेरफार करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अनिल शंकरराव देवापुरे असे या अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मांबाद-बासर रोडवरील शेत जमिनीचा फेरफार काढण्यासाठी तक्रारदाराकडून तलाठी अनिल शंकरराव देवापुरे याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार दिली.

यानुसार लाचलुचपत विभागाने धर्माबाद-बासर रोडवरील एका खासगी वजन काटा कार्यालयात सापळा रचला. याठिकाणी तक्राराकडून अडीच हजार रूपयांची लाच घेताना तलाठी देवापुरे यास रंगेहात पकडले. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कपील शेळके याच्यासह आदी पोलिस पथकाने केली.