Sat, Nov 17, 2018 14:15होमपेज › Nashik › दिंडोरी तालुक्यात जावयाची आत्महत्या 

दिंडोरी तालुक्यात जावयाची आत्महत्या 

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:59AMदिंडोरी : वार्ताहर

तालुक्यातील पालखेड येथे सासुरवाडीस आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. समाधान धोंडू पाटील (24, रा. हतनूर, ता. शिंदखेडा, जि. धुळे, हल्ली रा. नाईकवाडी, कल्याण) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

समाधान पाटील हा शुक्रवारी (दि.16) सासुरवाडीस आला होता. त्यावेळी त्याने सकाळी 11.30 च्या सुमारास विष पिले. ही बाब समजताच त्याचा भाऊ अनंत धोंडू पाटील यांनी समाधानला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना समाधानचा मृत्यू झाला. समाधान सासुरवाडीला आला त्यावेळी पत्नीसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर त्याने विषारी औषध सेवन केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी. एम. आव्हाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहे.