Sat, Jul 20, 2019 10:56होमपेज › Nashik › जळगावमध्ये ऊसतोड मजुराचा खून 

जळगावमध्ये ऊसतोड मजुराचा खून 

Published On: Jan 26 2018 2:23PM | Last Updated: Jan 26 2018 2:23PMजळगाव बुद्रुक : वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे काल रात्री दहा वाजता ऊसतोड मजुराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.  सुनील धर्मा केदार (वय, ३५ रा. करमूळ ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव ) असे खून झालेल्‍या मजुराचे नाव आहे.  

खुनाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळावर तपास सुरू केला असून, मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बशीर शेख करत आहेत.