Sat, Jul 20, 2019 13:00होमपेज › Nashik › अपघातात वरिष्ठ उपसंपादक ठार 

अपघातात वरिष्ठ उपसंपादक ठार 

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 2:06AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

येथील लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक गणेश कृष्णाराव धुरी (37) यांचे बुधवारी  रात्री  साडे दहा  वाजता अपघाती निधन झाले.

नवापूर  येथे  एका  नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून  परतीचा  प्रवास  करताना  चितेगाव फाटा  येथे त्यांच्या स्विफ्ट कारला उसाच्या भरलेल्या ट्रकने  जोरदार  धडक  दिली.  या  धडकेत  धुरी  यांच्या  डोक्याला  जबर  मार लागला तसेच संतोष कासार हे देखील जखमी झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, पाच बहिणी, मुलगा असा परिवार आहे.