Thu, Jan 17, 2019 22:34होमपेज › Nashik › नाशिक : केकतनिंभोरामध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिक : महाविद्यालयात प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्याची आत्‍महत्या

Published On: Jul 27 2018 10:41PM | Last Updated: Jul 27 2018 10:55PMजामनेर : प्रतिनिधी 

तालूक्यातील केकतनिंभोरा येथील रहिवासी चेतन रामदास सोनवणे (वय १८) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्या केली. ही घटना दि. २७ रोजी घडली.

मृत चेतन हा जामनेर येथील गिताबाई दत्तात्रय महाजन महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेत शिकत होता. काल दि. २७ रोजी चेतन हा नेहमीप्रमाणे कॉलेजला आला होता. यावेळी वर्गात बसलेला असताना वर्गशिक्षकांनी चेतनला  "कॉलेजला तुझा प्रवेश झालेला नाही तू कॉलेजला का येतोस"असे सांगून त्यास घरी जाण्यास सांगितले. चेतनला आपण कॉलेजची रितसर फी भरूनही कॉलेजने प्रवेश नाकारल्याने त्याला मानसिक धक्‍का बसला. यावेळी तो आपल्या घरी केकतनिंभोरा येथे आला. घरात मोठा भावाने विचारले असता त्याने काहीही उत्तर न देता घरात  बसला थोड्यावेळाने मोठा भाऊ बाहेर गेल्याचे बघून चेतन याने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. थोड्या वेळाने त्याचा भाऊ घरी आल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला.कॉलेजला हे वृत्त कळताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात विरोधात घोषणा देत पोलिस स्टेशन गाठले अन्‌ संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. चेतनच्या पश्चात आई , दोन भाऊ असा परिवार आहे.