Mon, Mar 18, 2019 19:40होमपेज › Nashik › रेशन दुकानांमधून पूर्वीप्रमाणे धान्य द्यावे

रेशन दुकानांमधून पूर्वीप्रमाणे धान्य द्यावे

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:14AMनाशिक : प्रतिनिधी

स्वस्त धान्य दुकानांमधून पूर्वीप्रमाणे साखर, डाळ, तेल व रॉकेल देण्यात यावे; केशरी शिधा पत्रिकाधारकांना पुन्हा धान्य देण्यात यावे. अन्न सुरक्षा योजनेमध्ये बीपीएल कार्डावरील कमी केलेेले धान्य नियमित करावे. यांसह विविध मागण्यांसाठी लोकमान्य नवक्रांती सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (दि. 20) मोर्चा काढण्यात आला.

लोकमान्य नवक्रांती सेनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रेशनवर मका घेणे सक्तीचे करू नये, महिन्याकाठी धान्य घेण्याची अट शिथिल करतानाच एखाद्या महिन्यात धान्य उचल न केल्यास पुढील महिन्यात दुप्पट धान्य लाभार्थ्यांना देण्यात यावे. आधारकार्ड लिकिंगबाबत दुकानदारांना प्रशिक्षण देऊन ते दुकानांमध्येच करण्यात यावे, रेशनकार्डवर कुटुंब प्रमुखाचा शिक्का रेशन दुकानांमधून देण्यात यावा, अन्न सुरक्षेचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्नाची अट एक लाखांपर्यंत वाढविण्यात यावी, धान्य घोटाळ्यांच्या तपासाला गती देऊन दोषींवर कारवाई केली जावी, रेशनवरील धान्याची दर्जा सुधारण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.

बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. शालिमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण परेवाल, बी. जी. गांगुर्डे, हेमा राय यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.