Fri, Apr 26, 2019 15:58होमपेज › Nashik › जात-पात विसरुन राष्ट्रहिताला प्राधान्य द्या; गिरीष महाजन 

जात-पात विसरुन राष्ट्रहिताला प्राधान्य द्या; गिरीष महाजन 

Published On: Aug 15 2018 12:50PM | Last Updated: Aug 15 2018 12:50PMनाशिक : प्रतिनिधी 

देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्राच्या उन्नतीत प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांनी जात-पात विसरुन राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. 

नाशिक विभागीय कार्यलयात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, ग्रामीण पोलिस अधिशक संजय दराडे, पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल आदी उपस्थित होते.

 ‘‘यंदाच्या वर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली होती. मात्र, महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा वापर काटकरीने करणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कृत्रीम पावसाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.