Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Nashik › महाराष्ट्र बंदला सातपुर मधून उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र बंदला सातपुर मधून उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jan 03 2018 4:35PM | Last Updated: Jan 03 2018 4:35PM

बुकमार्क करा
सातपूर : प्रतिनिधी

भिमा कोरेगाव प्रकरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सातपूरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. भिमा कोरगाव प्रकरणाचा निषेध म्हणून सातपूर शहरात बुधवारी कळकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दलित बांधवांनी रस्त्यावर उतरत व्यवसायिकांना बंदचे अवाहन केले. त्यामुळे अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सातपुर मधील सातपुर गांव,अंबड़,सजीव नगर,कामगारनगर,प्रबुद्धनगर,सातपुर लनी,अशोकनगर, कनगर,शिवाजीनगर,ध्रुवनगर,सह इतर सर्व ठिकाणी दुकाने बंद होती. परिसरातील काही शाळा महाविद्यालयांनी अघोषीत सुट्टी जाहीर केली. विद्यार्थी वाहतूक देखील बंद असल्याने परिसरातील शाळा बंद होत्या. परिसरातील मुख्य बाजार सातपुर येथील मुख्य भाजीमंडई सह सर्व भाजीमंडई बंद दिसून आल्या. सकाळी लिंक रोड परिसरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाल्याने अंबड़ लिंक रोडवर बॅरिकेट टाकत पूर्ण बंद करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब अंबेडकर मार्केट येथे कार्यकर्त्यांनी भीम स्तभ व नामफलकास वंदन करून  पुष्पहार अर्पण करत सर्व भीम सैनिकांकडून  शांततेते बंद पाळण्याचे आवाहन करत घटनेचा निषेध केला. सातपूर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होतो. सातपुर-अंबड़ औद्योगिक परिसरात अनुसूचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सार्वजनिक बससेवा बंद असल्याने कामगारांची कामावर पोहोचण्यास तारांबळ झाल्याचे दिसून आले. त्र्यंबकरोड वर रास्तोरोखो करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने हाणुन पाडला.