Sat, Nov 17, 2018 08:13होमपेज › Nashik › लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या

लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या

Published On: Mar 06 2018 1:51AM | Last Updated: Mar 06 2018 1:51AMनाशिक : प्रतिनिधी

वडनेर गावात राहणाऱ्या सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केली आहे. संतोष कुमार चौधरी (वय, ४३)असे या आत्‍महत्‍या केलेल्‍या लष्करी जवानाचे नाव आहे.

संतोषकुमार लष्करी सेवेतून २०१२ साली निवृत्त झाले होते. संतोषकुमार यांच्या नावावर असलेली 12-बोअर रायफलमधून त्यांनी स्‍वत:वर गोळी झाडली. 
घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी संतोषकुमार यांनी चिठ्ठी लिहून, मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे आणि कुणाविषयीही तक्रार नसल्याचे नमूद केले आहे.