Fri, Nov 16, 2018 21:49होमपेज › Nashik › अंधश्रद्धेपोटी रूग्णालयाऐवजी मंदिरात नेल्याने मुलीचा मुत्यू 

अंधश्रद्धेपोटी रूग्णालयाऐवजी मंदिरात नेल्याने मुलीचा मुत्यू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जळगाव बुद्रुक: वार्ताहर

सर्पदंश झालेल्या १३ वर्षीय बालिकेला रुग्णालयात नेण्याऐवजी भोळ्या अंधश्रद्धेपोटी छोट्या, मोठ्या अशा दोन मंदिरात तब्बल चार तास तिष्ठत ठेवले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये भरपूर वेळ गेल्याने ही बालिका प्राणास मुकल्याची दुर्दैवी घटना नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथे घडली. सर्पदंश होऊनही अंधश्रद्धेपोटी वैद्यकीय उपचार करण्यास हलगर्जीपणा केल्याने दोन महिन्यातला हा दुसरा बळी गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चिंचविहीर शिवारातल्या शेतात राहणार्‍या दत्तू तुरकूणे यांची मुलगी वैशाली (वय-१३) ही पिंपरखेड येथे सातवीच्या वर्गात शिकत आहे. काल रविवार असल्याने ती घरीच होती. दत्तू तुरकूणे हे शेतात कांद्याला पाणी देत होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा ते वैशालीला कांद्यास पाणी लावण्यास सांगून जेवायला गेले. पाणी भरल्यानंतर शेताच्या बांधावरून घराकडे जात असलेल्या वैशालीला विषारी सापाने दंश केला. ही घटना तिच्या पाठीमागून येत असलेल्या मोठ्या बहिणीने बघितली.

वैशालीला तत्काळ रुग्णालयात हलवण्याऐवजी येथील बिरोबाच्या मंदिरात नेण्यात आले. दोन तास त्या देवाचा धावा करून ही फरक पडत नसल्याने तिला पिंपरखेड येथील बिरोबाच्या मंदिरात हलवण्यात आले. मात्र दोन तास तेथेही काहीच फरक पडला नाही,याउलट तिची तब्येत आणखीनच ढासळली. शेवटी तिला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

छोट्या मंदिरात फरक पडला नाही म्हणून मोठ्या मंदिरात

एखाद्या आजारावर छोट्या रुग्णालयात फरक पडत नसेल तर मोठ्या रुग्णालयात हलवले जाते,आणि हीच बाब अंधश्रद्धेतही वापरली गेली.चिंचविहीर च्या छोट्या मंदिरात फरक वाटेना म्हणून चक्क पिंपरखेड येथील मोठ्या मंदिरात हलवण्यात आले.