Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Nashik › अ‍ॅड. निकम यांनी कसाबला हासडली होती अहिराणीतून शिवी

अ‍ॅड. निकम यांनी कसाबला हासडली होती अहिराणीतून शिवी

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 2:01AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

वकिली करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न केलेे. प्रामाणिकपणे काम करताना कधी-कधी संताप देखील होत असे. दहशतवादी कसाबचा खटला सुरू असताना  न्यायालयात त्याला अहिराणी भाषेतून ‘बाट्टोड’ अशी शिवी दिली होती. न्यायमूर्तींनी या शब्दाचा अर्थ विचारल्यावर हा फ्रेंच शब्द असल्याचे सांगितले, या आठवणीला अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी खान्देश महोत्सवात उजाळा दिला.

रविवारी (दि.31) खान्देश महोत्सवाची सांगाता झाली. प्रसंगी अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते ‘खान्देश रत्न 2017’ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना अ‍ॅड. निकम यांनी ही आठवण सांगितली. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, एमटीडीसीचे आशुतोष राठोड, रमेश गायधनी, रश्मी हिरे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. निकम म्हणाले, भाषेचा अभिमान बाळगा पण त्यावरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना एका सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी मी देखील व्यासपीठावर होतो. रजनीकांत यांना मराठी येते की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी रजनीकांत यांनी मराठीत संवाद साधत नमस्कार म्हटले होते, हे सांगत मातृभाषेचा अभिमान बाळगा असा सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला. योवळी अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते आर्किटेक्ट संजय पाटील, मुक्त विद्यापीठाचे कृषी संचालक डॉ. रावसाहेब पाटील, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, गायिका गिता माळी, ‘चला हवा येवू द्या’ सिरियल फेम कांचन पगारे,  स्वाती पाचपांडे, प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष व खान्देश मराठा मंडळाचे उपाध्यक्ष रवी पाटील, सामाजिक कार्यकर्ते नंदलाल जगताप, राजेश कोठावदे, ‘नसती उठाठेव’ मंडळाचे बापू कोतवाल, उद्योजिका विजया पाटील तसेच  विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या भूमिपुत्रांना खान्देश पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रश्मी हिरे व  सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन  केले. आ. सीमा हिरे यांनी आभार मानले.