Wed, Jul 17, 2019 08:49होमपेज › Nashik › नाशिक : नांदगावमध्ये बहिणीच्या आत्‍महत्‍येनंतर भावाची आत्‍महत्‍या

नाशिक : बहिणीच्या आत्‍महत्‍येनंतर भावाची आत्‍महत्‍या

Published On: Dec 26 2017 7:30AM | Last Updated: Dec 26 2017 7:30AM

बुकमार्क करा

नांदगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील सावरगाव येथील अल्पवीन मुलगी उज्वला निकम (वय १४) हिने दि. २३ रोजी आत्महत्या केली. त्यानंतर दि. २५ रोजी तिचा भाऊ सुदाम रामभाऊ निकम (वय २४) याने देखील विषारी द्रव्‍य सेवन करुन आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील दोघा भाऊ बहिणीने आत्महत्या केल्याने कुटुंबियांना धक्‍का बसला होत आहे.

सावरगाव येथील किशोर वयीन शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याच्या घटनेचा तपास लागण्या आगोदरच तिचा भाऊ सुदामनेदेखील आत्महत्या केली. नांदगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन सुदाम निकम या अविवाहित तरूणाने विषारी द्रव्‍य सेवन आत्महत्या केली.

घटनेची नांदगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याच्या आत्‍महत्‍येचे नेमके कारण समजले नाही. सावरगाव येथील चार दिवसात दुसरी आत्महत्या झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.